ऊजाळा जीवनाचा
दोन हजार वीस एकवीस वर्ष उजाडले अणं हे वर्ष संसार बेचिराख करणारंच ठरलं, दिवस होते कोरूना च्या हाहाकाराचे एका नर संहाराचे अर्थ चक्राला मंदावण्याचे.असेच दिवसांमागून दिवस जात होते कोरोनात थाळ्या पत्रे वाजवून जगण्याचा आत्मविश्वास वाढवत होतोत, साऱ्या देशातील जनसमूहासह. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यांच्या जिल्ह्यांच्या सिमा बंद केल्या सिमांना एकप्रकारे टाळेच ठोकले, या काळात कोणास ही घराबाहेर वावरता, पडता येत नव्हतें. माझे वडील संभाजीराव गोविंदराव घोबाळे निर्वत्तीधारक मुख्याध्यापक वय ७५ वर्षाच्या आसपास हे एक बेड पलंगावर ती समोरच्या घरातील खिडकीला बसून पुस्तक वाचत होते मार्च चा महिना रखरखत ऊन एक छोटंस कूलर सतत चालू असायचं.. कूलर च्या जवळचं पाण्याने भरलेला एक हंडा नेहमीच आई भरून ठेवायच्या कूलर पप्पाच्या पलंगा पासून दूर असल्यामुळें थंडावा जास्त नसे. खिडकीच्या बाहेरील वेलातून एखादी थंड हवेची झूळुक पाठीला गारवा देऊन जायची.वेलीच्या फुलावर परागकण घेण्याकरिता फुलपाखरं, छोट्याश्या चिमण्या, मधमाशा नेहमी त्या वेलिवरती येत असतं.काही चिमण्यांनी त्या वेलीवरती वेलीच्या जाळीतिल फांद्यांना छोटीसी गवत कापूस कागदांची घरटी केली होती, शांत वातावरण झाले की एखाद्या घरट्यातून पिल्लं बाहेर डोकावतांना करणार चिवचिवाट सारखा चालू असायचा छोटीसी चिमणी चोचित आणलेले अन्न पिल्लांच्या चोचित भरवत असे.दिवसभरात ती कितीवेळा इवल्याशा चोचित अन्न घेऊन घिरट्या मारत असे, हे विलोभणीय माझ्या मोबाईलने अनेकदा टिपले. हे पहातांना आपल्या लहानपणी आसचं भरविले असेल, आई वडिलांनी, हा लहानपणीचा उजाळा देऊन जायचा
आज २० मार्च २०२१ हा दिवस उजाडला याच दिवशी माझ्या आईस अट्याक आला व यात आईचे निधन झाले. माझे वडील सकाळपासूनच आईच्या आठवणीत होते. आईच्या आजाराचे निदान झाले असते तर.. राजूभाऊ आज तुझी आई आपल्यातं असती. ते फार भावूक होऊन त्यांना अश्रू अनावर झाले होते, मला पण माझे अश्रू अवरता आले नाही. आता दुपारचे बारा वाजले होतेे पप्पांनी आम्हांस मम्मी च्या आजारांबद्दल सांगण्यास सूरवात केली
मी त्यांच्याजवळ गेलो त्यांना म्हणालो पप्पा तुमच्या इन्शुलिनची दुपारची वेळ झाली आहे तरी पण पप्पा ज्योतिबा फुले यांच्या वरती पुस्तक वाचत होते बाजूला त्यांच्या जवळपास सहा पुस्तके व्यवस्थित रचून ठेवलेली होती मी पाहिले त्यात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वामनदादांच्या कवितेचे छोटी पुस्तिका आणि त्यांच्या जवळच एक कापडी पिशवी यात मी त्यांना त्यांच्यासाठी दिलेली आयुर्वेदिक औषधे लतुताईने अनुताईंनी आणलेले आवळ्याचे पॉकेट त्यात ठेवलेले होते.
Comments
Post a Comment