ऊजाळा जीवनाचा
दोन हजार वीस एकवीस वर्ष उजाडले अणं हे वर्ष संसार बेचिराख करणारंच ठरलं, दिवस होते कोरूना च्या हाहाकाराचे एका नर संहाराचे अर्थ चक्राला मंदावण्याचे.असेच दिवसांमागून दिवस जात होते कोरोनात थाळ्या पत्रे वाजवून जगण्याचा आत्मविश्वास वाढवत होतोत, साऱ्या देशातील जनसमूहासह. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यांच्या जिल्ह्यांच्या सिमा बंद केल्या सिमांना एकप्रकारे टाळेच ठोकले, या काळात कोणास ही घराबाहेर वावरता, पडता येत नव्हतें. माझे वडील संभाजीराव गोविंदराव घोबाळे निर्वत्तीधारक मुख्याध्यापक वय ७५ वर्षाच्या आसपास हे एक बेड पलंगावर ती समोरच्या घरातील खिडकीला बसून पुस्तक वाचत होते मार्च चा महिना रखरखत ऊन एक छोटंस कूलर सतत चालू असायचं.. कूलर च्या जवळचं पाण्याने भरलेला एक हंडा नेहमीच आई भरून ठेवायच्या कूलर पप्पाच्या पलंगा पासून दूर असल्यामुळें थंडावा जास्त नसे. खिडकीच्या बाहेरील वेलातून एखादी थंड हवेची झूळुक पाठीला गारवा देऊन जायची.वेलीच्या फुलावर परागकण घेण्याकरिता फुलपाखरं, छोट्याश्या चिमण्या, मधमाशा नेहमी त्या वेलिवरती येत असतं.काही चिमण्य...